मंगळवेढा - मराठा समाजासह धनगर, मुस्लीम, लिंगायत समाजाला आरक्षण मिळावे म्हणून राज्यात सर्वप्रथम आमदारकीचा राजीनामा देणाऱ्या स्व. भारत भालके यांच्या निधनानंतर ही आरक्षणाचा प्रश्न सुटला नसल्याने आंदोलन मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आरक्षणाचा लढा सुरूच आहे. विधानसभा निवडणुकीपासून सक्रिय सहभागी नसलेल्या भगीरथ भालकेनी आज मराठा आरक्षणाच्या आंदोलनात पहिल्या दिवशी आझाद मैदानावर पावसात हजेरी लावत आपला पाठिंबा व्यक्त केला.