Maratha Reservation : आधी आरक्षण, मग लगीन! आंदोलनात बोहल्यावर चढण्याअगोदर चक्क वधु-वराचा सहभाग

मोहोळ तालुक्यात मराठा समाजाने मोहोळ-आळंदी पालखी मार्ग रोखला.
bride groom Participation mohol alandi palkhi road block
bride groom Participation mohol alandi palkhi road blocksakal

मोहोळ - आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला असून, शनिवारी समाजाच्या वतीने मोहोळ शहरा जवळील मोहोळ- आळंदी हा पालखी मार्ग रोखून धरला. दरम्यान आंदोलनात चक्क बोहल्यावर चढण्या अगोदर नव वधू-वरा ने आपला रास्ता रोकोत सहभाग नोंदविला. हा जिल्ह्यात चर्चेचा विषय झाला आहे.

दरम्यान आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादीचे (उपमुख्यमंत्री अजित पवार गट) मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी आपली उपस्थिती लावली. उमेश पाटील आंदोलन स्थळी येताच आंदोलकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात घोषणाबाजी केल्याने काही काळ तणावाचे वातावरण झाले होते.

दहा टक्के आरक्षण देऊनही सकल मराठा समाजात शासना विरोधात रोष आहे. आरक्षणाचे प्रणेते मनोज जरांगे-पाटील यांच्या आदेशाने शनिवारी मोहोळ शहरा जवळील चंद्रमौळी गणेश मंदिर परिसरात समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. दरम्यान नुकतीच पंढरपूरची मोठी वारी संपल्याने परत जाणाऱ्या वारकऱ्यांच्या गाड्या तसेच इतर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. आरक्षणात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात येत होती.

दरम्यान याच पालखी मार्गावर आंदोलन स्थळा पासून जवळच मंगल कार्यालय आहे. त्या ठिकाणी पापरी येथील शेतकरी विलास टेकळे यांचा मुलगा प्रमोद व ढोक बाभूळगाव येथील अर्जुन मुळे यांची मुलगी प्रियंका यांचा शुभविवाह संपन्न होणार होता, मात्र तो पर्यंत रास्ता रोको आंदोलन सुरू झाले. विवाह सोहळा संपन्न होण्या अगोदर काही वेळ वधू-वराने चक्क रस्त्यावरच वऱ्हाडा सह ठिय्या मारला व आपला आंदोलनातील सहभाग नोंदविला.

त्यामुळे जिल्ह्यात या आंदोलनाची विशेष नोंद झाली म्हणले तरी वावगे ठरणार नाही. या घटनेमुळे "आधी लगीन कोंढाण्याचं" या म्हणीची अनेकांना आठवण झाली. नंतर नवीन जोडपे विवाह प्रक्रिये साठी मंगल कार्यालयात गेले.

दरम्यान मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील आले असता, त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात समाजाने घोषणाबाजी केली. थोड्या वेळ थांबून प्रवक्ते पाटील हे तिथून गेले.

प्रतीक्रिया -

आम्हाला शासनाने दहा टक्के आरक्षण दिले आहे परंतु ते मान्य नाही. आम्हाला ओबीसी तून आरक्षण मिळावे तसेच सग्या सोयऱ्याचा आदेश पारित करावा.

- प्रमोद टेकळे, नवरदेव पापरी ता मोहोळ

मी मराठा समाजाचा असल्याने मलाही आरक्षणाची आवश्यकता आहे. मी वैयक्तिक आंदोलनाला पाठिंबा द्यायला आलो होतो. मी प्रवक्ता म्हणून त्या ठिकाणी आलो नव्हतो व त्या ठिकाणी राजकारण करायलाही आलो नव्हतो. उपमुख्यमंत्री पवार व त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी आरक्षणा संदर्भात मार्ग काढत आहेत,त्यांच्या विरोधातील घोषणा बाजी योग्य वाटली नाही.

- उमेश पाटील, प्रवक्ता राष्ट्रवादी काँग्रेस.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com