Maratha Reservation : मराठ्यांना ओबीसी मधुन आरक्षण मिळावे यासाठी सकल मराठा बांधवांनी केला रास्ता रोको

कुर्डू, ता. माढा येथे मराठा आरक्षण साठी सकल मराठा बांधवांनी कुर्डुवाडी- टेंभुर्णी रोडवर सुमारे एक तास रास्ता रोको करण्यात आला.
Maratha Reservation : मराठ्यांना ओबीसी मधुन आरक्षण मिळावे यासाठी सकल मराठा बांधवांनी केला रास्ता रोको

कुर्डू - कुर्डू, ता. माढा येथे मराठा आरक्षण साठी सकल मराठा बांधवांनी कुर्डुवाडी- टेंभुर्णी रोडवर सुमारे एक तास रास्ता रोको करण्यात आला.

अंतरवली सराटी ता अंबड जिल्हा जालना येथे मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील मराठी बांधवांना ओबीसी मधुन आरक्षण मिळावे या मागणीच्या समर्थनार्थ कुर्डू येथील बसस्थानकावर सुमारे एक तास रस्ता रोको करण्यात आला.यावेळी मागणी चे निवेदन देण्यात आले. यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजुने वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या.

यावेळी संदिप पाटील, नामदेव हांडे, संभाजी ढाणे, यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी रामलिंग गाडे, संजय टोणपे, तानाजी हांडे, ऋषिकेश मउंगसू, श्रीकांत जगताप, श्रीकांत गायकवाड, बालाजी जगताप, रामहरी हांडे, सुहास टोणपे, संदीप कुनाळे यांच्या सह कुर्डूतील सकल मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com