
सोलापूर : जिल्ह्यात आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीतून न्यायालयात, पोलिसांत दाखल ३० वर्षांपर्यंतची २६ हजार ९८८ प्रकरणे खुद्द न्यायाधीश व पोलिस अधिकाऱ्यांसमोरच सामोपचाराने मिटविण्यात न्यायालयीन यंत्रणेला यश मिळाले आहे. त्यात नऊ जोडप्यांचा तुटण्याच्या उंबरठ्यावरील संसार देखील लोकअदालतीतून जुळला आहे.