
सोलापूर/मोहोळ : ‘एवढे दागिने घालून कोठे निघालात, पुढे पोलिसांची कारवाई सुरू आहे’ अशी भीती दाखवून दुचाकीवरून आलेल्या चौघांनी दुचाकीवरून गावाकडे निघालेल्या पती-पत्नीस वाटेत थांबवले. पोलिस कारवाईच्या भीतीने जयश्री लक्ष्मण दळवे (रा. पोखरापूर, ता. मोहोळ) यांनी तीन लाख २० हजार रुपयांचे दागिने काढून दिले. त्या दुचाकीस्वारांनी ते सगळेच दागिने चोरून नेल्याची फिर्याद दवळे यांनी मोहोळ पोलिसांत दिली आहे.