मोहोळ - पाणी आणण्यासाठी शेततळ्यावर गेलेल्या एका विवाहीत महिलेचा पाय घसरून ती शेततळ्यात पडून तिचा मृत्यू झाल्याची घटना शेटफळ, ता. मोहोळ येथे सोमवार ता. 25 रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घडली. रोहिणी निवृत्ती चव्हाण (वय-30 रा. शेटफळ. ता मोहोळ) असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. या बाबतची खबर विजय धनाजी जाधव याने मोहोळ पोलिसांत दिली आहे.