मंगल कार्यालय कर्मचारी करणार आंदोलन 

mangal karyalaya.jpg
mangal karyalaya.jpg

सोलापूर : सध्या संपूर्ण देशात कोरोनाचे सावट पसरले असुन शासनाने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सार्वजनिक कार्यक्रमांवर कठोर निर्बंध घातले आहेत. यामुळे मंगल कार्यालयातील कामगारांवर उपासमारीची वेळी आली आहे. 31 मार्चपर्यंत योग्य निर्णय न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा मंगल कार्यालय असोसिएशनने दिला आहे. 
मंगल कार्यालय, मंडप कॉन्ट्रॅक्‍टर, साऊंड इलेक्‍ट्रिक डेकोरेशन, मंगल भांडार, केटरिंग, फोटोग्राफर या सर्वांना कोरोनाच्या नियमांचा फटका बसला आहे. मंगल कार्यालयात 50 पेक्षा जास्त लोक असू नयेत, अशी अट आहे परंतु मर्यादा मंगल कार्यालय कर्मचारी, केटरिंग कर्मचारी, वाजंत्री, घोडेवाला, सजावट कामगार यांच्यासही ही संख्या मोजली जात आहे. 50 पेक्षा जास्त माणसे आढळताच दंडात्मक कारवाई केली जात आहे. यामुहे व्यवसाय बंद पडण्याची भीती येथील मंगल कार्यालयचालकांना आहे. या संघटनांनी प्रशासनाला 31 मार्च पर्यंत या व्यावसायासंदर्भात योग्य आणि सुलभ होईल असे धोरण आखावे अन्यथा आंदोलन करावे लागेल असा इशारा दिला आहे. 

 आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत
कोरोना रोगाचा प्रसार रोखण्यासाठी आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न करत आहोत. परंतु शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करीत या व्यवसायाला उभारी मिळू शकते. लोकांच्या रोजीरोटीचा प्रश्न सुटू शकतो. परंतु शासनाने घालून दिलेल्या जाचक अटी जर मागे घेतल्या नाहीत तर एक एप्रिलपासून आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत. 
- अभिजित टाकळीकर, अध्यक्ष, सोलापूर शहर व जिल्हा मंगल कार्यालय असोसिएशन 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com