सोलापूरच्या महापौरांसह कुटुंबियांनी केली कोरोनावर मात

सोलापूरच्या महापौरांसह कुटुंबियांनी केली कोरोनावर मात
Updated on

सोलापूर ः सोलापूरच्या प्रथम नागरीक महापौर  यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली. यशोधरा हॉस्पिटल मधून त्यांना शुक्रवारी सायंकाळी पुष्पवर्षाव व टाळ्यांच्या कडकडाटात उत्साही वातावरणात डिस्चार्ज देण्यात आला.

सोलापूरमध्ये दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा हा वाढतोच आहे.  एका बैठकीसाठी महापौर गेल्या असता त्या ठिकाणी संसर्ग होऊन कोरोनाची लागण झाली. मात्र, आता महापौर ठणठणीत बऱ्या होऊन घरी परतल्या आहेत.  दोन जून रोजी महापौर श्रीकांचना यन्नम यांचा कोरोना अहवाल पाॅझिटिव्हआला,  त्यांच्यासोबत त्यांचे पती आणि मुलगा ही कोरोनाबाधित झाले होता. आता ते तिघेही बाहेर पडले आहेत.  दरम्यान लोकांमध्ये वावरणे, महापालिकेच्या बैठकांना उपस्थिती लावणे यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

आता ठणठणीत बरे झाल्याने पुन्हा जनसेवेत सक्रिय होणार असल्याचा निर्वाळा महापौर यांनी दिला.यावेळी परिवहन सभापती जय साळुंखे, नगरसेवक शिवानंद पाटील,यशवंत पाठरूट आणि डॉक्टर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com