radhakrishna vikhe patil and ranjitsinh shinde
sakal
टेंभुर्णी - सीना-माढा उपसा सिंचन योजनेच्या 962 कोटी रूपये खर्चाच्या तृतीय सुधारीत प्रशासकीय मान्यता प्रस्तावास मंजूरी द्यावी. व सीना-माढा उपसा सिंचन योजनेच्या 234 कोटीच्या रूपयांच्या विशेष सुधारणा व दुरुस्ती योजनेतंर्गत पाईपलाईन व विद्युत मोटारी बदलण्याच्या कामास मंजुरी देऊन तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा. तसेच खैराव-मानेगाव उपसा सिंचन योजनेस प्रशासकीय मान्यता द्यावी. अशी मागणी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे - पाटील यांच्याकडे भेट घेऊन लेखी पत्राद्वारे केली असून, या संदर्भात पुढीलआठवड्यात तातडीने बैठक लावण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले असल्याची माहिती जिल्हा दूध संघाचे चेअरमन तथा भाजपा नेते रणजीतसिंह शिंदे यांनी दिली.