काय म्हणता...! सोलापुरात "मेट्रो'चे प्लॅनिंग 

Metro.jpg
Metro.jpg
Updated on: 

सोलापूर : केंद्र सरकारच्या मेट्रो ट्रेन योजनेत सहभाग घेण्यासाठी संबंधित शहराची तथा महापालिकेची लोकसंख्या 10 लाखांहून अधिक असावी लागते. 2011 च्या जनगणनेनुसार सोलापूर शहराची लोकसंख्या साडेनऊ लाखांपर्यंत होती, आता त्यात मोठी वाढ झाली आहे. फेब्रुवारी 2021 मध्ये जनगणना पूर्ण होणार आहे. सोलापूर महापालिका मेट्रोचा आराखडा तयार करून केंद्र सरकारला प्रस्ताव पाठविणार आहे. त्यादृष्टीने नियोजनाला सुरवात झाली आहे. 


शहरातील लोकसंख्येने 10 लाखांचा टप्पा पार केल्यानंतर त्या शहराने "मेट्रो'चे प्लॅनिंग करायला सुरवात करावी. लोकसंख्या 20 लाखांवर जाताच संबंधित शहराने "मेट्रो'च्या कामाची सुरवात करावी, असा नियम आहे. मागील 10 वर्षांच्या तुलनेत सोलापूर शहराचा विस्तार अन्‌ लोकसंख्या वाढली आहे. 2021 च्या जनगणेनुसार त्यावर शिक्‍कामोर्तब होणार असून मेट्रो सुरू करण्यास महापालिका इच्छुक असल्याचे नगरअभियंता संदीप कारंजे यांनी स्पष्ट केले. शहरातील वाढलेली वाहने आणि जागोजागी होणारी वाहतूक कोंडी, वाहनांमुळे वाढलेले हवा व ध्वनी प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने मेट्रोची गरज आहे. केंद्र सरकारने तशी योजना तयार केली असून त्यामध्ये पुण्यासह अन्य मोठ्या शहरांनी सहभाग नोंदवला आहे. पुण्यात मेट्रो सुरू करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने निधी दिला असून पुणे महापालिकेनेही कर्जरूपात निधी जमा केला. पुण्यातील मेट्रोसाठी 11 हजार 420 कोटींचा खर्च आला आहे. त्यातून पुण्यातील वाहतूक समस्या सुटेल, असा विश्‍वास पुणे मेट्रोचे संचालक अतुल गाडगीळ यांनी सोलापुरातील एका कार्यक्रमात व्यक्‍त केला. त्यांनी सोलापूर महापालिकेला मेट्रोची तयारी करण्याचे आवाहनही केले. 


"मेट्रो'मुळे होते सर्वकाही शक्‍य... 

  • मेट्रोमुळे शहरातील वाहतूक कोंडीवर हमखास निघतो तोडगा 
  • शहरातील उद्योग, अर्थकारण सुधारण्यास मिळतो वाव 
  • विनाअडथळा सार्वजनिक वाहतूक व्यवस्था राहते सुरळीत 
  • अपघात कमी होतात, जड वाहतुकीचा अडथळा होतो दूर 
  • हवा प्रदूषणावर नियंत्रण होणे शक्‍य : पर्यटन वाढीस मिळतो वाव 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pune Division Teachers Constituency
Drought Relief for Maharashtra Farmers Limited to Two Hectares as Officials Survey Crop Damage Across 265 Talukas
Global Recording of 'Chrysilla Volup' in Madha College Campus; Major Milestone in Biological Research
Maharashtra Drought Crisis Hits Pandharpur as Three Month Rain Break Threatens Rabi Season and Farmer Livelihoods
Marathi News Esakal
www.esakal.com