
सोलापूर : सोलापुरात छत्रपती संभाजी तलावात थापट्या पक्षी आढळून आला. या परदेशी पक्ष्यांचा परतीचा प्रवास सुरू झाल्याने तो आढळून आला आहे. छत्रपती संभाजी तलावात वन्यजीव छायाचित्रकार संदीप सरवदे रविवारी पक्षी व प्राणी निरीक्षण करत असताना व छायाचित्रे काढत असताना तब्बल ३ तासांच्या प्रतीक्षेतनंतर तलावात एक वेगळा असा बदक आढळून आला.