
महूद : महूदहून इंदापूरकडे दूध घेऊन निघालेला टँकर कोळेगाव (ता. माळशिरस) हद्दीत नव्याने सुरू असलेला रस्ता खचल्याने उलटला. त्यामुळे दूध टँकर रस्त्याच्या कडेला असलेल्या चारीत जाऊन पडल्याने सुमारे सात लाख रुपयांचे दूध वाहून गेले असून, टँकरचालक जखमी झाला आहे.