प्रभूलिंग वारशेट्टी
Solpaur : राजा शिवछत्रपतींचा जाज्वल्य इतिहास, त्यांचे शौर्य जाणून घ्यायचे असेल तर प्रत्यक्ष गड, कोट, किल्ले, दुर्ग यांना भेट देऊनच तो अनुभवता येतो. याच भावनेने शहरातील काही शिवभक्त संस्थांनी मागील अनेक वर्षांपासून अशा मोहिमा आयोजित करण्याचा विडा उचलत लाखो शिवभक्त सोलापूरकरांना महाराजांच्या शौर्यकथा उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. ही सेवा आजही अविरत सुरू आहे.