esakal | कॉंग्रेसमुळेच होतेय भाजपचे मिशन लोटस पूर्ण : फारुख शाब्दी
sakal

बोलून बातमी शोधा

Political

कॉंग्रेसमुळेच होतेय भाजपचे मिशन लोटस पूर्ण : फारुख शाब्दी

sakal_logo
By
प्रमोद बोडके : सकाळ वृत्तसेवा

कॉंग्रेसच भाजपची ए टू झेड टीम असल्याचा टोला एमआयएमचे शहराध्यक्ष फारुख शाब्दी यांनी लगावला.

सोलापूर : कॉंग्रेसचे (Congress) नेते काम करत नाहीत तर उलट एमआयएम (MIM) पक्षाला का दोष देता? आम्हाला बी टीम म्हणायचे सोडून द्या. जनतेला सर्व कळाले आहे की तुम्हीच भाजपची बी टीम आहात. कॉंग्रेस पक्षामधील निवडून आलेले आमदार, खासदार, मंत्री, भाजपमध्ये पक्ष प्रवेश करत आहेत. त्यामुळे भाजपचे मिशन लोटसही (Mission Lotus) पूर्ण होत आहे. कॉंग्रेसने आपल्या पराभवाचे आत्मचिंतन करावे, तुमच्या पराभवाचे खापर दुसऱ्यावर का फोडता? कॉंग्रेसच भाजपची ए टू झेड टीम असल्याचा टोला एमआयएमचे शहराध्यक्ष फारुख शाब्दी (MIM city president Farooq Shabdi) यांनी लगावला. (MIM city president Farooq Shabdi accused the Congress party)

हेही वाचा: आठवी ते बारावीची भरणार ऑफलाइन शाळा ! शिक्षकांना राहावे लागणार गावातच

कॉंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे (MLA Praniti Shinde) यांनी एका कार्यक्रमात एमआयएमला मत म्हणजे भाजपला मत असल्याचे वक्तव्य केले होते. ऑल इंडिया मजलिस - ए - इत्तेहादुल मुस्लिमीन अर्थात एमआयएमचे शहराध्यक्ष फारुख शाब्दी यांनी जोरदार उत्तर दिले आहे. शहराध्यक्ष शाब्दी म्हणाले, शहर मध्यमधून 2019 ची विधानसभा निवडणूक मी लढविली. माझ्या विरोधात कॉंग्रेसने प्रचारासाठी ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Shinde) यांना आणले होते. मात्र त्यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मग मला सांगा, भाजपची बी टीम कोण आहे, असा प्रश्‍नही शाब्दी यांनी उपस्थित केला आहे. कॉंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी आपल्या खबऱ्यांच्या पगारी वाढवाव्यात; कारण हे खबरी आपणास चुकीची माहिती देत आहेत. राजकारण करावे मात्र खालच्या स्तरावर जाऊन राजकारण करू नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. मुस्लिम बांधवांना कुराणची शपथ देऊन त्यांना जलील करू नका. आम्हाला आता बी टीम म्हटल्यावर फरक पडत नाही. आम्ही जनतेचे काम करून निवडून येऊ, असा विश्‍वासही शाब्दी यांनी व्यक्त केला.

हेही वाचा: पंढरपुरात आषाढी वारीत 17 ते 25 जुलैपर्यंत संचारबंदी !

दोन्ही लॉकडाउनमध्ये एमआयएमचे चांगले काम

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व लॉकडाउनमध्ये ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन या पक्षाने 20 हजार कुटुंबांना अन्नधान्य वाटप केले. अनेक दवाखान्यांना पीपीई किट व नागरिकांना मास्क वाटप केले. एमआयएमने जेवढे काम केले तेवढे काम कोणत्याच नेत्यांनी, पक्षांनी केले नाही. यापुढेही गरिबांसाठी काम करणार असल्याचेही शाब्दी यांनी सांगितले.

loading image