विकासकामांसाठी मिळेना निधी ! एमआयएम, वंचितसह सत्ताधारी नगरसेवकांचा आंदोलनाचा इशारा 

Fund
Fund
Updated on

सोलापूर : रस्त्यांवरील खड्डे महापालिकेने अद्याप बुजविलेले नाहीत. दुसरीकडे शहराअंतर्गत रस्त्यांची बिकट अवस्था झाली असून नागरिक नगरसेवकांना शिव्या देऊ लागले आहेत. त्यामुळे महापालिकेने रस्त्यांची डागडुजी तत्काळ करावी, अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा एमआयएमचे गटनेते रियाज खरादी यांनी दिला. तर 14 व्या वित्त आयोगातील निधीस सभेने मंजुरी देऊनही कामांना सुरवात झाली नसल्याबद्दल माजी सभागृह नेता सुरेश पाटील यांनी आयुक्‍तांना पत्र दिले आहे. 

शहरातील अनेक ठिकाणचे रस्ते खराब झाले असून, रस्त्यांवरील दिवाबत्तींचीही दुरवस्था झाली आहे. व्हीविकासकामांसाठी मिळेना निधी ! एमआयएम, वंचितसह सत्ताधारी नगरसेवकांचा आंदोलनाचा इशाराआयपी रोड, सात रस्ता ते गांधीनगर रोड, जुना पूना नाका ते छत्रपती शिवाजी महाराज चौक, सरस्वती चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या रस्त्यांवर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर असते. तरीही खड्डे बुजविले जात नाहीत. दरम्यान, सोशल हायस्कूल ते जिंदाशा मदार चौक ते पद्मशाली चौक, किडवाई चौक ते जेलरोड, हॉटेल रॉयल आणि मजदूर क्‍लब ते कालिका मंदिरापर्यंतचा रस्ता 20 वर्षांपासून तसाच आहे. या ठिकाणचे नागरिक नगरसेवकांविरुद्ध आक्रमक झाले असून महापालिका आयुक्‍तांनी रस्त्यांचे काम कधीपर्यंत पूर्ण होईल, ते स्पष्ट करावे. अन्यथा 6 नोव्हेंबरला दुपारी साडेचार वाजता आंदोलन केले जाईल, असे निवेदन खरादी यांनी दिले आहे. तर एक दिवसाआड पाण्यासाठी नगरसेवक गणेश पुजारी यांनी निवेदन देत आंदोलनाचा इशारा दिला आहे. 

106 नगरसेवकांकडून पत्र घेऊन कामे करावीत 
14 व्या वित्त आयोगातून महापालिकेला घनकचरा व्यवस्थापनाअंतर्गत 126 कोटी 32 लाख 87 हजार 552 रुपयांचा निधी मिळाला आहे. निती आयोगातील शिफारशीनुसार तो खर्च करावा लागणार आहे. दरम्यान, सार्वजनिक शौचालये, मुताऱ्या बांधणी व दुरुस्तीसाठी 13 कोटी, कचरा संकलनासाठी 13 कोटी, घंडागाडी दुरुस्ती व इंधनासाठी सहा कोटी आणि स्वच्छ सर्वेक्षणाअंतर्गत मानांकनासाठी 11 कोटी 63 लाख 56 हजार 778 रुपयांची मागणी करण्यात आली. मात्र, त्यापैकी 26 कोटी 63 लाख 56 हजार 778 रुपयांच्या निधीतून नाले सफाई, सार्वजनिक शौचालये, मुताऱ्यांसाठी व स्वच्छ अभियानाअंतर्गत कामे करण्यास सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली. मात्र, अद्याप ही कामे सुरू झालेली नाहीत. आता या कामांची सुरवात करण्यापूर्वी महापालिकेतील 101 नगरसेवक व पाच स्वीकृत नगरसेवकांकडून पत्रे घ्यावीत, अशी मागणी सुरेश पाटील यांनी आयुक्‍तांकडे केली आहे. अन्यथा नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असाही इशारा त्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Semi-Constructed Water Tank Poses Severe Threat to Students
Solapur Hotgi Lake IT Park Project To Get 35 Acres Land As 12 Acres Will Be Reserved For Infrastructure Facilities
Railway Project
Solapur ZP School
Marathi News Esakal
www.esakal.com