
-प्रमोद बोडके
सोलापूर : मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर सोलापूरच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी आल्यानंतर आता माणचे (जि. सातारा) सुपुत्र डॉ. सचिन ओम्बासे यांच्यावर महापालिका आयुक्तपदाची जबाबदारी आली आहे. पालकमंत्री गोरे आणि आयुक्त डॉ. ओम्बासे यांची त्यांच्या गावाकडील गट्टी सोलापूरकरांच्या फायद्याची ठरू शकते. पालकमंत्री आणि महापालिका आयुक्त यांच्यात पूर्वीपासून सुसंवाद असल्याने महापालिकेच्या कारभारात अनेक महत्त्वाच्या घडामोडी होऊ शकतात.