मंत्री बाळासाहेब थोरात, यशोमती ठाकूर उद्या सोलापुरात घेणार कोरोनाचा आढावा 

yashomati thakur and balasaheb thorat
yashomati thakur and balasaheb thorat
Updated on

सोलापूर : राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, महिला व बालविकास मंत्री ऍड. यशोमती ठाकूर उद्या (शनिवार) सकाळी 11 वाजता सोलापूर शहर व जिल्ह्यातील कोरोनाच्या स्थितीचा व उपाययोजनांचा आढावा घेणार आहेत. आज (शुक्रवारी) रात्री लातूर व उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यानंतर हे दोन्ही मंत्री सोलापुरात मुक्कामी येणार आहेत. उद्या सकाळी कोरोना स्थितीचा आढावा घेणार आहेत. 

माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या निवास्थानी हे दोन्ही मंत्री आज सांत्वनपर भेट देण्यासाठी गेले आहेत. त्यानंतर औसा येथील बसवराज पाटील, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या तुळजापूर येथील निवासस्थानी हे दोन्ही मंत्री भेट देणार आहेत. आज रात्री नऊ वाजता सोलापुरातील शासकीय विश्रामगृहात या दोन्ही मंत्र्यांचे आगमन होणार आहे.

उद्या (शनिवारी) सकाळी पावणे नऊ वाजता जिल्हा कॉंग्रेस समितीमध्ये त्यांचे आगमन होणार आहे. त्यानंतर सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेऊन दुपारी 1 मोहोळ, पंढरपूर मार्गे माळशिरसला जाणार आहेत. कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या निवासस्थानी ते सांत्वनपर भेट देणार आहेत. त्यानंतर दुपारी चार वाजता बारामतीला रवाना होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pandharpur Vitthal Temple Tightens Rules, Improves Devotee Facilities in Queue
solapur city police
solapur dcc bank
Lane Change Leads to Deadly Crash Near Solapur; Family Devastated
Marathi News Esakal
www.esakal.com