शिंदे सरकारमधील मंत्री सावंत सोलापूर दौऱ्यावर! बार्शीतून थेट भूम-परांड्याला जाणार

शिंदे-फडणवीस सरकारमधील नुतन मंत्री तानाजी सावंत हे मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. पण, बार्शी येथील बीआयटी कॉलेज येथून ते मोटारीतून थेट परांड्याला जाणार आहेत.
Tanaji Sawant
Tanaji Sawantsakal
Updated on

सोलापूर : भाजप-शिवसेना युती सरकारमध्ये जलसंधारण मंत्री राहिलेल्या आमदार तानाजी सावंत यांना महाविकास आघाडीत संधी मिळाली नाही. त्यावेळी ते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज होते. पण, आता शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना लॉटरी लागली. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ते धाराशिव दौऱ्यावर येत आहेत.

मंत्री तानाजी सावंत दौऱ्यावर पण...
शिंदे-फडणवीस सरकारमधील नुतन मंत्री तानाजी सावंत हे मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. पण, बार्शी येथील बीआयटी कॉलेज येथून ते मोटारीतून थेट परांड्याला जाणार आहेत. भूम-वाशीतून ते धाराशिवमधील शासकीय विश्रामगृह येथे जातील, असा त्यांचा १३, १४ ऑगस्टचा दौरा आहे. स्वातंत्र्यदिनी ते धाराशिवमध्ये ध्वजावंदन करतील.

  • असा आहे दौरा…
    - शनिवारी (ता. १३) सायंकाळी पाच वाजता पुण्याहून मोटारीचे बार्शीकडे प्रयाण
    - शनिवारी रात्री साडेदहा वाजता बार्शीतील बीआयटी कॉलेज, बार्शी येथे आगमन व मुक्काम
    - रविवारी (ता. १४) सकाळी साडेआठ वाजता ते मोटारीने परांड्याला निघतील
    - सकाळी साडेनऊ वाजता परांडा (जि. धाराशिव) येथे पोहचतील
    - त्याच दिवशी सकाळी साडेअकरा वाजता ते भूमकडे निघणार आहेत
    - दुपारी १२ ते तीन वाजेपर्यंत भूम येथे आणि त्यानंतर सायंकाळी चार वाजता वाशीला येतील
    - रविवारी सायंकाळी सात वाजता वाशीतून धाराशिवमधील शासकीय विश्रामगृहाकडे निघतील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Solapur Rain
Solapur Cyber Fraud
radhakrishna vikhe patil and ranjitsinh shinde
Pune Teachers Constituency
Marathi News Esakal
www.esakal.com