
सांगोला : पूर्वी राज्याची सिंचन क्षमता ३.८६ लाख हेक्टर होती, आता ती ५५ लाख हेक्टरवर पोहोचली आहे. यात आणखी वाढ करण्यासाठी आधुनिक सिंचन पद्धतीचा अवलंब करण्यावर जोर दिला पाहिजे. पाण्याचे व्यवस्थापन आणि उपलब्ध पाणीसाठ्याचा प्रभावी वापर केला पाहिजे. महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी केले.