Abuse Minor girl : अल्पवयीन मुलीवर कोंढेज येथे अत्याचार; करमाळ्यातील युवकावर ‘पोक्सो’अंतर्गत गुन्हा
Solapur News: किचनचा दरवाजा बंद केला व माझ्या मुलीवर बळजबरीने अत्याचार केला. हा प्रकार कोणाला सांगितला तर घरातील लोकांना जिवे मारण्याची धमकी सागर साबळे याने दिली होती. त्यामुळे मुलीने घाबरून ही घटना कोणाला सांगितली नाही.
The Karmala youth arrested in Kondhe for assaulting a minor girlSakal
करमाळा : कोंढेज (ता. करमाळा) येथील १२ वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याने ती मुलगी गरोदर राहिल्याची घटना घडली आहे. याबाबत सागर दत्तात्रय साबळे (वय २३, रा. कोंढेज ता. करमाळा) याच्याविरुद्ध बलात्कार व पोक्सो कायद्यांंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.