चळे येथील तरूण भीमा नदीपात्रात बेपत्ता; पंढरपूर तालुक्‍यात दिवसातील दुसरी घटना 

Missing youth in Bhima river basin in Chale another incident of day in Pandharpur taluka
Missing youth in Bhima river basin in Chale another incident of day in Pandharpur taluka
Updated on

चळे (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) : चळे येथील भिमा नदीत मित्रांसोबत पोहायला गेलाला तरूण पोहायला येत नसल्यामुळे नदीच्या पत्रात वाहून गेला. सुमित बंडू वाघमारे (वय 23) असे वाहून गेलेल्या तरूणाचे नाव आहे. दरम्यान, पंढरपूर तालुक्‍यातील वाहून जाण्याची ही आजच्या दिवसातील दुसरी घटना आहे. 
उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्यात आल्याने सध्या नदीचे पात्र तुंडूंब भरले आहे. आज सकाळी भोसे (ता. पंढरपूर) येथील बंधाऱ्यात इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या दोन मुली बुडाल्याची घटना घडली होती. त्यातच दुपारी एक वाजण्याच्या सुमारास चळे येथील पात्रात एक तरूण वाहून गेल्याची घटना घडली आहे. सुमित बंडू वाघमारे (वय 23) हा चळे येथील तरूण आपल्या मित्रांसमवेत भिमा नदीत पदुबाई मंदिराजवळ पोहायला गेला होता. त्याला पोहायला येत नसल्यामुळे तो नदीच्या पत्रात वाहत गेला. सध्या सोलापूरला पिण्याच्या पाण्यासाठी उजनी धरणातून पाणी सोडल्यामुळे भिमा नदी तुडुंब भरली आहे. घटना दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. गावातील काही युवक होड्या घेऊन सुमितचा शोध घेण्याचा प्रयत्न करत होते. पण पाण्याचा वेग जास्त असल्यामुळे शोध कार्यात अडथळा निर्माण झाला होत असून अद्याप त्याचा शोध लागला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Council Election Strategy in Action: BJP Mobilizes Corporators, Ensures Early Voting
Court Battle Looms Over Chemical Treatment of Vitthal-Rukmini Idol in Pandharpur
solapur
MLA Devendra Kothe  
Marathi News Esakal
www.esakal.com