आरोग्य व्यवस्था सुधारणार : आ.आवताडे

आरोग्य सेवा सक्षम करण्याच्या दृष्टीने अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रश्न उपस्थित
आ. समाधान आवताडे
आ. समाधान आवताडे sakal
Updated on

मंगळवेढा :- कोरोना संकटात गोर गरीब रुग्णाचे उपचारावरून झालेले हाल पाहता आ. समाधान आवताडे यांनी तालुक्यातील आरोग्य सेवा सक्षम करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करताना अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रश्न उपस्थित करत त्यांचा पाठपुरावा सुरूच ठेवला.कोरोनाच्या पहिल्यापेक्षा दुसऱ्या लाटेचा तडाखा पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील नागरिकाला बसला अशा याच दरम्यान मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकी नंतर अनेक राजकीय नेते गायब झाले व रुग्णांना बेड मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला खाजगी रुग्णालयात अनेकांची लूट झाली त्यात अनेकांना आपला प्राण गमवावा लागला.

त्यामुळे तालुक्यातील आरोग्य व्यवस्थाच चव्हाट्यावर आली. विधिमंडळ कामकाज आ. समाधान आवताडे यांना फारसा अनुभव नसताना देखील दुसऱ्या अधिवेशनात सहभागी होण्यापूर्वी आ.समाधान आवताडे यांनी आरोग्य व्यवस्था सक्षम करण्याच्या दृष्टीने त्यांच्या संपर्क कार्यालयात आरोग्य खात्याच्या अधिकार्‍यांची बैठक घेऊन 9 उपकेंद्रे व अस्तित्वात असलेल्या आरोग्य केंद्र उपकेंद्राच्या माध्यमातून तालुक्याच्या ग्रामीण भागात आरोग्य सेवा देण्याबाबत च्या सूचना दिल्या व ग्रामीण भागातील पीडी सुरू करून आरोग्य कर्मचाऱ्यांना मुख्यालयात राहण्याच्या सूचना दिल्या पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालय व मंगळवेढ्यातील ग्रामीण रुग्णालयातील सध्या असलेल्या खाटांची संख्या दुप्पट करण्याच्या दृष्टीने आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची मुंबई येथे भेट घेऊन त्याबाबत निवेदन दिले व जिल्हाधिकारी यांच्याबरोबर झालेल्या नियोजन मंडळाच्या बैठकीत देखील आरोग्य व्यवस्थेवर जोर दिला नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पी अधिवेशन मध्ये त्यांनी हेच प्रश्न लावून धरताना व निंबोणी येथील प्रलंबित ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न देखील मार्गी लावण्याची मागणी केली.

आ.अवताडे यांच्या रडारवर आरोग्यव्यवस्था असल्याचे आता स्पष्ट झाले त्यामुळे भविष्यात त्यांच्याकडून नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देणार असल्याचे आता जवळपास स्पष्ट झाले त्यामुळे आता त्यांनी मांडलेल्या प्रश्नांची तड लावण्याची जबाबदारी देखील त्यांच्यावर येऊन पडली आहे. या अधिवेशनात याशिवाय वसतिगृहाचा प्रश्न,प्रदूषित चंद्रभागा, एम.आय.डी.सी, पौट साठवन तलाव, 18 वर्षाच्या पुढील निराधार मुलाच्या संगोपनाच्या डाळिंब नुकसान डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई,अनेक दुर्लक्षित प्रश्नावर नवखे असताना त्यांनी विधानसभेत आवाज उठवला.

राज्यात असलेले महाविकास आघाडी सरकार व स्थानिक आमदार हे परस्परविरोधी असल्याचे चित्र आतापर्यंत अनेक वेळा या मतदारसंघात दिसले त्याचा परिणाम मतदारसंघातील अनेक विकास कामावर झाला त्यामुळे मतदार संघाच्या प्रश्नासाठी विधानसभेत आवाज व पाठपुरावा करून या मतदारसंघातील प्रश्‍न आता पर्यंतच्या लोकप्रतिनिधीना सोडवावे लागले हे आजपर्यंत चित्र आहे. त्यामुळे अवताडे यांना तोच पॅटर्न वापरावा लागणार आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com