Mangalwedha News : आमदार अभिजीत पाटीलांना मंगळवेढ्याचा मोह सुटेना

माढा मतदारसंघातून आमदार झालेल्या अभिजीत पाटील यांना मंगळवेढ्याचा मोह काही केल्या सुटेना.
Abhijit Patil
Abhijit Patilsakal
Updated on

मंगळवेढा - माढा मतदारसंघातून आमदार झालेल्या अभिजीत पाटील यांना मंगळवेढ्याचा मोह काही केल्या सुटेना. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने अभिवादन करणारे फलक मंगळवेढा देखील लावल्यामुळे भविष्यात राजकीय मोळी पुन्हा मंगळवेढ्यात बांधणार का? अशी चर्चा या निमित्ताने सुरू झाली.

2024 च्या विधानसभा निवडणुकीत आमदार होण्यासाठी अभिजीत पाटीलानी दोन-तीन वर्ष मंगळवेढ्यात राजकीय मोर्चे बांधणी करण्यासाठी कार्यकर्ते जोडले. अनेक कार्यक्रमांना उपस्थिती लावली. शिवाय काही कार्यक्रमाला आर्थिक रसद देखील दिली. परंतु ऐनवेळी त्यांना माढा मतदारसंघातून उमेदवारी मिळाली.

मात्र तीन वर्षात बांधलेली राजकीय मोळी आणि जोडलेले कार्यकर्ते हा सर्व संच नव्याने आखाड्यात उतरलेले अनिल सावंत यांच्या पाठीमागे विधानसभेच्या आखाड्यात जोडला. त्यामध्ये त्यांना जेमतेम 11 हजाराच्या आसपास मते मिळाली असली तरी ती मते भगीरथ भालके यांच्या पराभवास कारणीभूत ठरली.

असे असताना अभिजीत पाटील हे माढा मतदारसंघातून आमदार झाले. तरी नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये त्यांनी मंगळवेढ्यातील बसवेश्वर स्मारकाचा प्रश्न उपस्थित केला.

सध्या तालुक्यातील मयत कुटुंबाला भेटी, आंबेडकर जयंती व महात्मा फुले जयंतीच्या कार्यक्रमाला लावलेली उपस्थिती याशिवाय सध्या चैत्र महिन्यात सुरू असलेल्या गाव जत्रांना लावलेली हजेरी व पाहता त्यांचा भविष्यातील देखील राजकीय बस्थान मजबूत करण्याच्या दृष्टीने ते मंगळवेढा प्रयत्नशील असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त शहरात अनेक सामाजिक संघटना राजकीय नेत्यांनी त्यांना अभिवादन करणारे फलक मंगळवेढ्यात लावले आहेत. आ. समाधान आवताडे यांनी लावलेल्या फलका शेजारी त्यांचा देखील फलक लावल्यामुळे दोन्ही फलक सध्या शहरांमधील लक्षवेधक आणि चर्चेचे झाले आहेत.

मात्र, आ. अवताडे यांच्या फलका शेजारी लावलेला आ. अभिजीत पाटलाचा फलक मात्र भविष्यातील राजकीय मोर्चेबांधणी बाबतचा तर नाही ना? अशी चर्चा होत असताना आ. अभिजीत पाटील यांना मंगळवेढ्याचा मोह देखील सुटत नसल्याचे दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com