
सांगोला : सांगोला तालुक्यातील शिरभावीसह ८१ गावांची प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना लवकरच कार्यान्वित होणार असल्याची माहिती डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी दिली. आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी शिरभावीसह ८१ गावांची प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेसंदर्भात मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत ही योजना चालू न झाल्यास ८२ गावे व वाड्या- वस्त्यांवर पाणीटंचाई उद्भवणार असून, सध्या सांगोला तालुक्यात पाणीटंचाई जाणवण्याची चिन्हे आहेत. ही योजना तातडीने कार्यान्वित करण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांना पटवून दिली.