
सोलापूर : आमदारांना समान प्रमाणात निधी मिळत नसल्याच्या नाराजीनाट्यातून सरकारमध्ये अनेक मोठे बदल घडले. पण, एप्रिलमध्ये मंजूर झालेला आमदार निधी अडीच महिन्यानंतरही वितरित झालेला नाही. जिल्हा नियोजन समित्यांचीही अवस्था अशीच आहे, तरीदेखील सत्ताधारी एकही आमदार नाराज दिसत नाही हे विशेष.