नंदेश्वर ग्रामपंचायत बिनविरोध झाल्यास आमदार पडळकर देणार रुग्णवाहिका भेट !

Gopichand Padalkar
Gopichand Padalkar
Updated on

पाटकळ (सोलापूर) : मंगळवेढा तालुक्‍यातील सर्वांत जास्त राजकारणाच्या बाबतीत चर्चेत असणारे गाव म्हणजे नंदेश्वर. आणि या नंदेश्वर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सध्या मोठ्या प्रमाणात अर्ज भरण्यास सुरवात झालेली आहे. तरी नंदेश्वर ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी एका बाजूने दुसऱ्या फळीचे मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. नंदेश्वर ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाल्यास आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून अत्याधुनिक सर्व सुखसोयींनी युक्त सुसज्ज अशी रुग्णवाहिका भेट देणार असल्याचे त्यांचे समर्थक, मल्हार महासंघाचे मंगळवेढा तालुकाध्यक्ष अंकुश गरंडे यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. 

नंदेश्वर गावामध्ये धनगर समाजाचे मोठ्या प्रमाणात मताधिक्‍य असून, या गावामध्ये आपल्याच भावकी व पै - पाहुण्यांमध्येच निवडणुकीसाठी रस्सीखेच लागल्याचे दिसून येते. त्यामुळे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांनी पुढे येऊन ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. मात्र, दुसऱ्या बाजूने मोठ्या प्रमाणात अर्ज भरण्यासही सुरवात झालेली आहे. ही निवडणूक बिनविरोध करून आपापसातील वाद, भांडणे व तंटे मिटवून घेऊन आपल्या गावाच्या विकासासाठी मोठ्या संख्येने आपणच एकत्रित येऊन पुढाकार घ्यावा व ही निवडणूक बिनविरोध करावी, तसेच नंदेश्वर हे गाव तीर्थक्षेत्र म्हणून नावारूपाला पुढे आणण्यासाठी आपले योगदान द्या व त्यासाठी कोणत्याही प्रकारचा निधी लागला तर मी माझ्या आमदार फंडातून देईन, असा संदेश गोपीचंद पडळकर यांनी त्यांच्या समर्थकांमार्फत नंदेश्वर ग्रामस्थांना दिला आहे. 

नंदेश्वर ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आमचे मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. आणि ही निवडणूक बिनविरोध झाल्यास आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून सुसज्ज अशी रुग्णवाहिका गावास भेट देण्यात येणार आहे. 
- अंकुश गरंडे, 
तालुकाध्यक्ष, मल्हार महासंघ, मंगळवेढा 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Solapur DCC Bank Loan : ओंकार साखर कारखाना ग्रुपला दिलेल्या कर्जाची चौकशी करावी  अॅड. दिपक पवार यांची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या सर्वसाधारण सभेत मागणी
Mohol Taluka Appoints Administrators For 73 Gram Panchayats As Eight Officers Shoulder Charge Of Multiple Villages
Amol Shinde Comments On Deshmukh Camp And BJP Rivals As Chandrakant Patil Says Der Hai Andher Nahi
Pandharpur Crime 55 Year Old Woman Held for Allegedly Killing 70 Year Old Lover DNA Report Reveals Victim Identity
Marathi News Esakal
www.esakal.com