
मोहोळ - जानेवारी 2023 मध्ये उजनीचा डावा कालवा फुटून परिसरातील शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीचे पैसे त्वरित त्यांना द्यावेत अशी मागणी मोहोळचे आमदार राजू खरे यांनी जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत केल्याने, येत्या आठ दिवसात नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना पैसे मिळतील अशी ग्वाही जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. त्यामुळे आमदार राजू खरे यांच्या या मागणी मुळे आज तरी 154 शेतकऱ्यांचा नुकसान भरपाई चा प्रश्न मार्गी लागला आहे.