Samadhan Autade : समाधान आवताडेंना अधिवेशनावेळी सोपवली मोठी जबाबदारी; मंगळवेढ्यात आनंदोत्सव

MLA samadhan Avatade: विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आज विधानसभा सभापती पदाच्या खुर्चीवर येथील आ. समाधान आवताडे यांना बसण्याचा मान मिळाल्यामुळे मंगळवेढ्यातून आनंद व्यक्त केला जात आहे.
MLA samadhan Avatade
MLA samadhan AvatadeEsakal

मंगळवेढा ता.1 सकाळ वृत्तसेवा :- विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आज विधानसभा सभापती पदाच्या खुर्चीवर येथील आ. समाधान आवताडे यांना बसण्याचा मान मिळाल्यामुळे मंगळवेढ्यातून आनंद व्यक्त केला जात आहे.2021 साली झालेल्या पोटनिवडणुकीतून विजय संपादन झालेल्या आ. समाधान आवताडे यांना राजकीय अनुभव कमी असला तरी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास संपादन केल्यामुळे त्यांचे ते विश्वासू सहकारी म्हणून आतापर्यंत परिचित झाले.

त्यामुळे त्यांना या सभापती पदावर बसण्याची संधी मिळाली आहे यापूर्वी स्व.आ. भारत भालके यांना देखील मिळाला होता. कोणत्याही राजकीय वारसा नसताना शून्यातून मजूर सोसायटी ते ठेकेदारी व्यवसायातून मोठा विश्वास समाजात संपादन केला. त्यामुळे त्यांचा या व्यवसायात नावलौकिक झाला. यातून तालुका व बाहेरील अनेक शिक्षित बेरोजगार तरुणांच्या हाताला रोजगार देण्याचे काम त्यांनी केले.

MLA samadhan Avatade
Vidhan Parishad Election: विधानपरिषदेसाठी काँग्रेसचा उमेदवार ठरला; या नावावर केलं शिक्कामोर्तब

त्याच्या जोरावर त्यांनी विधानसभेची वाट धरली. सुरुवातीला अपयश आले. मात्र चिकाटी न सोडता सातत्य ठेवल्याने अखेरीस त्यांनी विधानसभेच्या सभागृहात प्रवेश केला. विधिमंडळाच्या कामाचा अनुभव नसताना देखील तीन वर्षांत तालुक्यात विविध विकास कामासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी प्राप्त केला.त्यातून आमदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये त्यांना तालिकाध्यक्ष पदाची संधी मिळाली.

MLA samadhan Avatade
Medha Patkar : मेधा पाटकर यांना 5 महिन्यांची शिक्षा; 10 लाखांचा दंड, काय आहे प्रकरण?

आज प्रत्यक्ष कामकाजात सायंकाळच्या सत्रात त्यांना सभापती पदाचे काम करण्याची संधी मिळाली. आमदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये त्यांना सभापती पदाचे कामकाज हाताळण्याची जबाबदारी मिळाल्याने मंगळवेढ्यात आनंदोत्सव साजरा केला जात आहे.विधीमंडळातील सुरू असलेल्या या कामकाजाची माहिती मंगळवेढ्यातील अनेक नागरिकांनी मोबाईल, यूट्यूब,टी.व्ही च्या माध्यमातून पाहिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com