Wadapur Barrage Cum Bridge : ई-सकाळच्या वृत्ताची दखल; वडापूर बंधाऱ्याचे बॅरेज-कम-पुलात रूपांतर करण्याची आ. समाधान आवताडे यांची मागणी

ई-सकाळमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल घेत आमदार समाधान आवताडे यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे भीमा नदीवरील सिद्धापूर-वडापूर बंधाऱ्याचे रुंदीकरण करून बॅरेज-कम-पूल उभारण्याची मागणी केली आहे.
MLA Samadhan Awatade demands barrage cum bridge at Siddhapur Wadapur on Bhima River in Solapur

MLA Samadhan Awatade demands barrage cum bridge at Siddhapur Wadapur on Bhima River in Solapur

Sakal

Updated on

मंगळवेढा : भीमा नदीवरील सिद्धापूर- वडापूर येथील बंधाऱ्यावरतील सद्यस्थितीत अस्तित्वातील रस्ता व पूल हे अत्यंत अरुंद असून वाढत्या वाहतुकीसाठी अपुरा आहे. पूरस्थितीत दोन महिने हा पूल पाण्याखाली असल्यामुळे नागरिकांना तसेच वाहनांना ये-जा करणे पूर्णपणे अशक्य होते. त्यामुळे येथील बंधाऱ्याचे रुंदीकरण करून बेरजेस कम पूल असा येथील बंधारा तयार करण्यात यावा अशी मागणी आ. समाधान आवताडे यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली. याबाबतचे वृत्त ही सकाळ ने 20 जुलैला प्रसिद्ध केले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com