esakal | "चुकीचं काही घडल्यास मी सोलापूर जिल्ह्यासोबत! "उजनी'तील एक थेंब पाणी इतरत्र वळवू देणार नाही'
sakal

बोलून बातमी शोधा

Ujani_Shinde

"चुकीचं काही घडल्यास मी सोलापूर जिल्ह्यासोबत ! "उजनी'तील एक थेंब पाणी इतरत्र वळवू देणार नाही'

sakal_logo
By
अण्णा काळे : सकाळ वृत्तसेवा

करमाळा (सोलापूर) : इंदापूरला उजनीचे पाच टीएमसी पाणी देण्यासाठी शासनाने निर्णय दिल्याने सोलापूर जिल्ह्यातून या निर्णयाला विरोध सुरू झाला आहे. "याबाबत करमाळ्याचे लोकप्रतिनिधी म्हणून भूमिका काय?' असा मुद्दा उपस्थित केला होता. आमदार संजय शिंदे सध्या कोरोना पॉझिटिव्ह असल्याने ते क्वारंटाईन आहेत. मात्र इंदापूरला दिल्या जाणाऱ्या प्रश्नावर फेसबुकवर पोस्ट करत त्यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे.

फेसबुकवर पोस्ट करत आमदार संजय शिंदे त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की...

मी संजयमामा शिंदे, माझ्या व माझ्या नेत्यांच्या संबंधित विरोधक नेहमी गैरसमज व संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. माझे नेते अजितदादा पवार व पवार कुटुंबीय यांच्या संदर्भात माझ्या जीवनात असाधारण महत्त्व आहे आणि ते मी हृदयात जपलंय. त्याचा इतरांच्या सारखा बाजार कधीच मांडला नाही व त्या भांडवलावर कधीच कुठलं पद मिळवले नाही वा कोणत्याही संस्था वाचवण्यासाठी त्याचा वापर केला नाही. जेव्हा कधी वेळ आली तेव्हा इतर नेत्यांसारखा पळसुद्धा काढला नाही. शेवटच्या क्षणी नेत्यांनी जो आदेश दिला तो मी पाळला आहे, भलेही त्यात माझा राजकीय नफा - तोटा झाला असेल. असो...

उजनीच्या पाच टीएमसी पाण्यासंदर्भात मी जाहीरपणे सांगतो, जर चुकीच्या पद्धतीने काही घडल्यास मी सोलापूर जिल्हा वासीयांच्या सोबत खांद्याला खांदा लावून लढेन. गरज पडल्यास मी माझ्या मतदार संघासाठी व जिल्ह्यातील जनतेसाठी सर्वस्व पणाला लावेन. पण... उजनी धरणांमधलं सोलापूर जिल्ह्याचे हक्काचे पाणी एक थेंबही इतरत्र वळवू देणार नाही.

loading image