आता बोलत बसायचं नाय, करुनच दाखवायचायं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MLA Shahaji Bapu Patil

'आता मी हे करतो' तो निधी आणतो, पाट - पुरावा करतो असं बोलत बसायचं नाय, कोणाला काय बालायंचाय ते बोलू द्या, कोणाला राजकारण करायचं ते करू द्या.

MLA Shahaji Bapu Patil : आता बोलत बसायचं नाय, करुनच दाखवायचायं

सांगोला - 'आता मी हे करतो' तो निधी आणतो, पाट - पुरावा करतो असं बोलत बसायचं नाय, कोणाला काय बालायंचाय ते बोलू द्या, कोणाला राजकारण करायचं ते करू द्या. मुख्यमंत्री शिंदे साहेब उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असेपर्यंत बोलण्यापेक्षा आता मला करूनच दाखवायचं आहे असा आशावाद सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केला.

सांगोला तालुक्यातील महावितरण विभागाकडून हातीद येथे नवीन उपविभागास महाराष्ट्र शासनाची मंजुरी मिळालीची माहिती आमदार शहाजी बापू पाटील देत आता अजुन बरसंच करुन दाखवायचंय असेही ते म्हणाले. आमदार शहाजीबापू पाटील बोलताना पुढे म्हणाले की, महावितरण विभागातील तालुक्यात नवीन उपविभाग मंजुरीसाठी बऱ्याच दिवसापासून प्रयत्न सुरू होते. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे असतानाही याबाबत पाठपुरावा केला होता. परंतु त्यास यश मिळाले नाही.

सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या कार्यकाळातच हातीद येथे नवीन उपविभागास महाराष्ट्र शासनाची मंजुरी मिळाली आहे. याचा फायदा तालुक्यातील विशेषत: शेतकरी बांधवांना होणार आहे. रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्याचे काम मी या सरकारच्या कार्यकाळात करणार आहे. ते तुम्हाला दिसतीलच. मी याविषयी जास्त बोलणार नाही. आता निधी विषयी, विविध कामांच्या पाठपुराव्या विषयी मी काहीच बोलणार नाही.

आता जे काय करायचं आहे ते मी करूनच दाखवणारच. मुख्यमंत्री शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असेपर्यंत या तालुक्याचा कायापालट केल्याशिवाय मी स्वस्थ राहणार नसल्याचेही आमदार शहाजी बापू पाटील यांनी बोलून दाखवले. आता तुम्हाला काहीच बोलणार नाही. कोण काय बोलतयं, काय राजकारण करतयं ते बघत बसायच नाही. कोणाला राजकारायचंय ते करू द्या मी फक्त करूनच दाखवणारचं असेही शेवटी त्यांनी सांगितले.