मटण-मासे व पैसे वाटून लढवली सांगोला कारखान्याची निवडणूक! आमदार शहाजीबापूंचा मोठा गौप्यस्फोट | Solapur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'मटण-मासे व पैसे वाटून लढवली सांगोला कारखान्याची निवडणूक!'
मटण-मासे व पैसे वाटून लढवली सांगोला कारखान्याची निवडणूक! आमदार शहाजीबापूंचा मोठा गौप्यस्फोट

'मटण-मासे व पैसे वाटून लढवली सांगोला कारखान्याची निवडणूक!'

पंढरपूर (सोलापूर) : सांगोला सहकारी साखर कारखान्याच्या (Sangola Cooperative Sugar Factory) निवडणुकीत मतदारांना तीन- तीन हजार रुपये रोख वाटले, शिवाय त्यांना मटण आणि माशांची पार्टीही दिली. त्या काळात 57 लाख रुपये वाटून कारखान्याची निवडणूक लढवली, असा मोठा गौप्यस्फोट सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील (MLA Shahaji Patil) यांनी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील (Co-operation Minister Balasaheb Patil) यांच्या उपस्थितीत झालेल्या एका कार्यक्रमात केला. आमदार पाटील यांच्या गौप्यस्फोटानंतर सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुकीत होणाऱ्या गैरप्रकाराचे जळजळीत सत्य आणि वास्तव समोर आले आहे. सांगोला सहकारी साखर कारखान्याच्या दुरवस्थेला मी स्वतः काही प्रमाणात जबाबदार असल्याची जाहीर कबुली देत, याच कार्यक्रमात त्यांनी शेतकऱ्यांची माफी देखील मागितली.

हेही वाचा: 'कोजागरी'साठी तुळजापुरात प्रवेश नाहीच! उस्मानाबादमध्ये जिल्हाबंदी

वाकी शिवणे (ता. सांगोला) येथील सांगोला शेतकरी सहकारी साखर कारखाना अलीकडेच राज्य सहकारी बॅंकेने पंढरपूर येथील उद्योगपती अभिजित पाटील यांच्या धाराशिव साखर कारखान्याला 25 वर्षांच्या भाडेपट्टा कराराने चालवण्यास दिला आहे. अभिजित पाटील यांनी अवघ्या दीड महिन्यात कारखाना सुरू केला. कारखान्याचा प्रथम गळीत हंगामाचा प्रारंभ सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते गव्हाणीत मोळी टाकून झाला. याच कार्यक्रमात या कारखान्याचे माजी अध्यक्ष आमदार शहाजी पाटील यांनी

कारखान्याच्या निवडणुकीत सभासदांना पेैसे वाटून आणि त्यांना मटण खायला घालून कारखान्याच्या निवडणुकीत गणपतराव देशमुख गटाला कसा हिसका दाखवला, हे सांगताना त्यांनी कारखान्याच्या निवडणुकीत आपण कसा प्रताप केला, हे देखील सांगून टाकले. कारखान्याच्या दुरवस्थेला माझ्यासह सर्वच नेते जबाबदार आहेत. मी देखील तितकाच पापी असल्याची कबुली देत, त्यांनी याच जाहीर कार्यक्रमात शेतकऱ्यांची माफी देखील मागितली. आमदार पाटील यांच्या या गौप्यस्फोटामुळे कारखाना का बंद पडला, याचे उत्तरही उपस्थितांना मिळाले.

सांगोला साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून माजी आमदार (कै.) गणपतराव देशमुख यांच्याकडे माझे काही संचालक घ्या, असा प्रस्ताव ठेवला होता. त्यावेळी गणपतराव देशमुख यांनी वेळ निघून गेल्याचे सांगितले. त्यानंतर दिल्ली, हरियाणा, लुधियाना येथून विमानाने सभासदांना आणले. एवढेच नाही तर सभासदांना तीन तीन हजार रुपये वाटप केले. निवडणुकी दरम्यान 1700 सभासदांना कोल्हापुरात ठेवले. त्या ठिकाणी त्यांच्या खाण्यापिण्याची व पत्ते खेळण्यासाठी लागणारे पैसेही दिले, असेही आमदार पाटील यांनी या वेळी सांगितले.

हेही वाचा: विधान परिषदेसाठी भाजपचेच पारडे जड! राष्ट्रवादीला मिळेना उमेदवार

आमदार पाटील यांनी कारखाना उभारणीमध्ये कोणी कोणी कसा गैरकारभार केला, याची उदाहणे देत, कारखान्याच्या दुरवस्थेला आम्ही जबाबदार असल्याचेही मान्य केले. आमदार पाटील यांच्या गौप्यस्फोटानंतर राज्यातील सहकारी साखर कारखान्यांत चालणाऱ्या गैरकारभाराचे सत्य समोर आले आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top