"पराभवाच्या भीतीने 'डीसीसी'ची निवडणूक पुढे ढकलली"

"पराभवाच्या भीतीने 'डीसीसी'ची निवडणूक पुढे ढकलली"
Updated on
Summary

केवळ पराभवाच्या भीतीने सरकारने या बँकेच्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत, असा आरोप माजी सहकार मंत्री तथा आमदार सुभाष देशमुख यांनी केला आहे.

उ. सोलापूर (सोलापूर): सध्या प्रशासकाच्या आधिपत्याखाली असलेली सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणुका ३१ मार्चपर्यंत लांबणीवर टाकण्याचा राज्य सरकारचा निर्णय अत्यंत चुकीचा आहे. सोलापूरच्या बँकेवर गेल्या अनेक दिवसांपासून प्रशासक आहे ही बँक सुस्थितीत आहे. केवळ पराभवाच्या भीतीने सरकारने या बँकेच्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत, असा आरोप माजी सहकार मंत्री तथा आमदार सुभाष देशमुख यांनी केला आहे.

"पराभवाच्या भीतीने 'डीसीसी'ची निवडणूक पुढे ढकलली"
आमदार सुभाष देशमुख यांच्या मुलासह भाजपचा एक आमदार अडचणीत !

राज्य सरकारने नाशिक, नागपूर, बुलढाणा आणि सोलापूर या मध्यवर्ती बँकेच्या निवडणुका 31 मार्चपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. यातील नागपूर आणि बुलढाणा या बँका डबघाईस आलेल्या आहेत. नाशिकच्या बँकेवर नुकतेच प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर अनेक दिवसांपासून प्रशासकाची नियुक्ती आहे. या बँकेची परिस्थिती सुधारलेली आहे. त्यामुळे सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय अत्यंत चुकीचा आहे. महाविकास आघाडी सरकारने पराभवाच्या भीतीने निवडणूक पुढे ढकलली आहे.

"पराभवाच्या भीतीने 'डीसीसी'ची निवडणूक पुढे ढकलली"
सरसकट शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची आमदार सुभाष देशमुख यांची मागणी 

सोलापूर जिल्ह्यात पूर्णपणे भाजपचे वर्चस्व आहे. भाजपच्या ताकदीपुढे आपला निभाव लागणार नाही अशी भीती महाविकासआघाडी सरकारपुढे आहे. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँक भाजपच्या ताब्यात जाईल आणि महाविकास आघाडीची फजिती होईल यामुळेच सरकारने या बँकेची निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा बँकेवर प्रशासक आल्यापासून या बँकेची परिस्थिती सुधारलेली आहे. तरी लवकरात लवकर या बँकेची निवडणूक घ्यावी, अशी मागणी आमदार सुभाष देशमुख यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com