esakal | आमदार यशवंत माने : भागाईवाडी विकासाचं मॉडेल 
sakal

बोलून बातमी शोधा

bhagaiwadi

सोयाबीन नुकसानीची भरपाई द्या 
उत्तर सोलापूर तालुक्‍यात अति पावसामुळे खरीप पिकाचे नुकसान झाले असुन यामध्ये सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान आहे. सदर नुकसानीचे पंचनामा करून भरपाई देण्याची मागणी कृषी मित्र लहु घोडके यांनी आमदार माने यांच्याकडे केली. 

आमदार यशवंत माने : भागाईवाडी विकासाचं मॉडेल 

sakal_logo
By
प्रमोद बोडके

सोलापूर : माजी आमदार दिलीपराव माने व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांच्या नेतृत्वाखाली लोकसहभागातून भागाईवाडीत (ता. उत्तर सोलापूर) झालेले काम हे ग्राम विकासाचे मॉडेल आहे. जे काम माझ्या गावात झाले नाही, बळिराम साठे यांच्या गावात झाले नाही, तेवढे काम तुम्ही केलात असे म्हणत भागाईवाडीच्या ग्रामस्थांवर कौतुकाचा वर्षाव मोहोळचे आमदार यशवंत माने यांनी केला आहे. या गावासाठी दिलेला पाच लाख रुपयांचा निधी अल्प आहे. कोरोना संकट संल्यानंतर मागाल तेवढा निधी भागाईवाडीस देईन असा विश्‍वासही मोहोळचे आमदार यशवंत माने यांनी दिला. 

भागाईवाडी येथे 25-15 योजनेतून अंतर्गत रस्ता कॉंक्रीटीकरण व दलित वस्ती सुधारणा अंतर्गत कामाचा शुभारंभ आमदार माने यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते बळीराम साठे होते. यावेळी सभापती रजनी भडकुंबे,पंचायत समितीचे सदस्य हरीभाऊ शिंदे, बाजार समितीचे संचालक जितेंद्र साठे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रल्हाद काशीद, युवक अध्यक्ष बालाजी पवार, अकोलेकाटीचे सरपंच भाऊसाहेब लामकाने, मनोज साठे, हरी घाडगे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता राजशेखर जेऊरकर, भागाईवाडीच्या सरपंच कविता घोडके पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. 

अध्यक्षीय भाषणात साठे म्हणाले, आमदार माने यांनी अल्प काळात तालुक्‍यात 42 ते 50 कोटी रुपयांचा निधी आणला आहे. तालुक्‍यातील विकासासाठी ते ध्येयाने काम करीत आहेत. विकास कसा असतो, त्यासाठी दृष्टिकोन, ईर्षा महत्त्वाची आहे. कविता घोडके पाटील या दांम्पत्याने गावाचा लोकसहभागातून विकास केला. त्यामुळे गावाची ओळख समाजात निर्माण झाली. आता राज्यात भागाईवाडीची ओळख निर्माण झाली आहे.

प्रास्ताविकात सरपंच कविता घोडके पाटील म्हणाल्या, दिलीपराव माने, काका साठे यांचे सहकार्य व गावातील नागरीकांचे पाठबळ मिळाले. आता आमदार माने यांनी मागेल तेवढा निधी व रस्त्याचे काम करण्याचा शब्द दिला आहे. त्यामुळे गावचा विकासात्मक लौकिक आणखी उंचावत राहील. यावेळी उपसरपंच पद्मिनी घोडके, सदस्य शकुंतला घोडके,महादेव चौधरी, वैभव घोडके, अंकुश घोडके, मधुकर घोडके तानाजी जाधव, विनोद हावळे, सारंग शिंदे, महेश घोडके, वैजिनाथ हावळे, अनंत हावळे, अशोक चौधरी, सजित पाटील, बब्रुवाहन घोडके, भिमराव घोडके, प्रताप पाटील, रामहरी घोडके, ग्रामविकास अधिकारी कृष्णात डवले, ग्रामसेविका सुवर्णा घोडके, आदिसह भागाईवाडी शेरेवाडी गावातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

loading image
go to top