कुर्डुवाडी : पुणे ते कोइमतूर प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांच्या झोपेचा गैरफायदा घेऊन चोरट्याने मोबाईल चोरून नेला. प्रवाशाच्या बँकेच्या खात्यावरील १ लाख ४३ हजार रुपयांची रक्कम चोरट्याने काढून घेतली. मोबाईल चोरीची घटना एलटीटी सीबीई एक्स्प्रेस (११०१३) या गाडीमध्ये २३ मार्चला पहाटेच्या सुमारास घडली.