Mangalwedha News : मोदी आवास मध्ये केंद्राच्या निकषाप्रमाणे वंचीत जातीचा समावेश; प्रदीप खांडेकर यांच्या प्रयत्नाला यश

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेतील तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना जवळपास 14 हजार लाभार्थी घरकुलासाठी ड यादीतून निश्चित केले.
pradeep khandekar
pradeep khandekarsakal

मंगळवेढा - मोदी आवास घरकुल योजनेमध्ये ओबीसी प्रवर्गाच्या लाभार्थ्यांमध्ये केंद्राच्या जातीचा यादीचा निकष लावून धनगर, हटकर, वडर, कैकाडी या जातीमधील लाभार्थ्यांना मोदी आवास मधून लाभ द्यावा, अशी मागणी जिल्हा नियोजन मंडळ सदस्य प्रदीप खांडेकर यांनी केल्यानंतर अखेर शासनाने 30 जानेवारीच्या शासन निर्णयानुसार या प्रवर्गातील जातीचा योजनेमध्ये समावेश केला.

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेतील तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना जवळपास 14 हजार लाभार्थी घरकुलासाठी ड यादीतून निश्चित केले. या यादीमधील फक्त ओबीसी प्रवर्गातील लाभार्थी मोदी आवास घरकुल येण्यासाठी पात्र ठरविण्यात आल्यामुळे त्यांना लवकर घरकुलाचा लाभ मिळणार आहे.

परंतु यासाठी समाविष्ट जातीचा निकष ठरवताना केंद्राच्या निकषांमध्ये धनगर, हटकर, कैकाडी, वडार, या जाती तील लाभार्थी ओबीसी प्रवर्गात निश्चित केले. परंतु मोदी आवास मध्ये फक्त राज्यातील जातीचा निकष लावल्याने या जातीचे लाभार्थी घरकुल लाभापासून वंचित वंचित राहणार आहेत. सध्या या प्रवर्गातील या जातीचा समावेश केल्यास तालुक्यातील निम्म्याहून अधिक बेघरांना याचा लाभ होणार आहे.

त्या दृष्टीने प्रधानमंत्री आवास घरकुल योजना ही केंद्र सरकारची असल्याने यासाठी निवडलेल्या केंद्राच्या निकषाप्रमाणे निवडलेले आहेत त्यामुळे राज्याने त्यांचा स्वतंत्र निकष न लावता केंद्रीय निकषाच्या आधार घेऊन जास्तीत जास्त बेघरांना घरकुलाचा लाभ देण्याच्या दृष्टीने या जातीचा समावेश करून त्यांना घरकुलाचा लाभ द्यावा अशी मागणी नियोजन मंडळ सदस्य खांडेकर यांनी केली होती.

त्या संदर्भातील फक्त ई सकाळने देखील प्रसिद्ध केले होते याची दखल शासनाने घेत या वगळलेल्या जातीचा या योजनेसाठी समावेश केल्यामुळे लाभार्थ्यांमधून आनंद व्यक्त केला जात आहे. मात्र या लाभार्थ्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना व अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेचा लाभ घेतलेल्या नसावा ही अट लावण्यात आली.

मंगळवेढा तालुक्यामध्ये मोदी आवास योजनेमध्ये वगळलेल्या जातीचा समावेश केल्यामुळे तालुक्यातील वंचित लाभार्थ्यांना या योजनेतून घरकुलाचा लाभ मिळणार असल्यामुळे बेघराची संख्या घटण्यास मदत होणार आहे.

- प्रदीप खांडेकर, सदस्य जिल्हा नियोजन मंडळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com