Water Crisis: तुळशी करांनी काढलं गाव विकायला

Modnimb Water Crisis, Sina Madha Irrigation, Farmers Protest : मोडनिंब परिसरातील अडीच तपांहून अधिक काळ सुरू असलेला पाण्याचा संघर्ष कायम आहे. सीना-माढा उपसा सिंचनाचे पाणी मिळावे यासाठी आंदोलने, उपोषणे आणि सरकारी बैठका होऊनही प्रश्न अद्याप कायम असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
Villagers in Modnimb continue their long-standing demand for water from the Sina Madha Lift Irrigation Project.

Villagers in Modnimb continue their long-standing demand for water from the Sina Madha Lift Irrigation Project.

esakal

Updated on: 

मोडनिंब,: अडीच तपाहून अधिक काळ असलेला पाण्याचा संघर्ष मिटता मिटेना. प्रत्येक निवडणुकीला पुढार्‍यांच्या आश्वासनाचा पाऊस. गावकऱ्यांना आता या निवडणुकांचा आणि आश्वासनाचाच कंटाळा आलाय. हाकेच्या अंतरावरून गेलेल्या सीना माढा उपसा सिंचन च्या पाण्यासाठी अनेक वेळा आंदोलने झाली, उपोषणे झाली, सरकार दरबारी बैठका झाल्या. पुढाऱ्यांकडून बैठकांचे, आश्वासनांचे एच डी व्हिडिओ समाज माध्यमावर प्रसारित करण्यात आले. पण पाण्याची गती मात्र बफरच होत राहिली. दररोज चाळीस हजार लिटर दुधाचे उत्पादन करणाऱ्या या गोकुळातील तुळशीकरांनी आता आपलं गावच विकायला काढलंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com