Madha Lok Sabha Election: मोहिते-पाटील समर्थकांना प्रतीक्षा ‘तुतारी’च्या निर्णयाची, चर्चा, दौरे सुरू, निर्णय होईना

Madha Lok Sabha Election: मोहिते-पाटील समर्थकांना तुतारीच्या निर्णयाची प्रतीक्षा लागली असून धैर्यशील मोहिते-पाटील लढणार की माघार घेणार? याची मतदारसंघात उत्सुकता आहे.
Madha Lok Sabha Election
Madha Lok Sabha ElectionEsakal

अकलूज : सुमारे आठ दिवसांपूर्वी सहकार महर्षी कारखान्याचे अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील यांनी ‘आमचं ठरलंय, तुतारी हाती घेणार’ अशी स्पष्ट भूमिका मांडली होती. मत्रा, अद्याप याबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे मोहिते-पाटील समर्थकांना तुतारीच्या निर्णयाची प्रतीक्षा लागली असून धैर्यशील मोहिते-पाटील लढणार की माघार घेणार? याची मतदारसंघात उत्सुकता आहे.

जयसिंह मोहिते पाटील यांच्या ‘आमचं ठरलंय, तुतारी हाती घेणार’ हे जाहीर केल्यानंतर मोहिते-पाटील समर्थक आणि कार्यकर्त्यांनी शरद पवार, विजयसिंह मोहिते-पाटील व धैर्यशील मोहिते पाटील यांचे फोटो असलेल्या पोस्ट समाज माध्यमावर व्हायरल केल्या. मात्र, अद्याप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून माढा मतदारसंघाच्या उमेदवाराची घोषणा झालेली नाही.

मोहिते-पाटील कुटुंबातील सर्व सदस्य माढा मतदारसंघातील गावांना भेटी देत कार्यकर्त्यांची मते आजमावत आहेत. यामध्ये धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या पत्नी शीतलदेवी मोहिते-पाटील यांनी करमाळा, माढा तसेच माळशिरस तालुक्यातील अनेक गावे पिंजून काढली आहेत.

Madha Lok Sabha Election
Rashmi Barve: काँग्रेसला मोठा धक्का! रश्मी बर्वेंची निवडणूक लढू देण्याबाबतची विनंती कोर्टाने फेटाळली!

वास्तविक धैर्यशील मोहिते-पाटील यांनी भाजपकडे माढा मतदारसंघातून उमेदवारीची मागणी केली होती. मात्र भाजपने माढा मतदार संघासाठी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज झालेल्या मोहिते-पाटील यांची नाराजी दूर करण्यासाठी भाजपचे संकटमोचन गिरीश महाजन यांनी शिवरत्न बंगल्यावर हजेरी लावली. कार्यकर्त्यांसमोर बोलताना अजून खूप वेळ आहे.

आपली नाराजी,राग पक्षश्रेष्ठींच्या कानावर घालतो, काहीतरी सकारात्मक घडेल असे सांगितले. मात्र काहीच घडले नाही. त्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी अकलूज येथे भेट दिली. त्याचबरोबर भाजपचे प्रचारप्रमुख प्रशांत परिचारक यांनीही भेट दिली. खासदार कोल्हे यांनी मोहिते-पाटील यांनी स्वाभिमानाची तुतारी हाती घ्यावी ही कार्यकर्त्यांची भावना आपल्याला समजले असल्याचे सांगितले.

Madha Lok Sabha Election
Navneet Rana: नवनीत राणा यांना मोठा दिलासा! निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा

भाजपचे संकटमोचन गिरीश महाजन येऊन गेल्यानंतर काहीतरी आशादायी करेल अशी अपेक्षा धरून बसलेल्या कार्यकर्त्यांचा संयम सुटत गेला. नाराज कार्यकर्त्यांनी तुतारी हाती घ्या, असा आग्रह धरला. आपला माणूस आपला खासदार, आता माघार नाही या आशयाच्या पोस्टने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला असून, कार्यकर्ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून उमेदवारी जाहीर होण्याची प्रतीक्षा करीत आहेत.

Madha Lok Sabha Election
BMC: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यासह इतर मंत्र्याची ९५ लाख रूपयांची पाणीपट्टी थकली; BMC कधी करणार वसुली?

या आहेत शक्यता

मोहिते-पाटील परिवार कोणत्या मुद्द्यावर आपले बंड मागे घेणार? याबाबत ‌तर्क-वितर्क लढविले जात असून विधानसभेला दुसऱ्या मतदारसंघात उमेदवारी देऊन भाजप त्यांची समजूत काढू शकते

मोहिते-पाटील परिवार राजकीयदृष्ट्या अस्तित्व सिद्ध करण्यासाठी निवडणूक रिंगणातून माघार घेणार नाही, अशीही चर्चा

Madha Lok Sabha Election
Ncp Political Crisis: अजित पवार गटाला चिन्हावरून न्यायालयानं फटकारलं; जाहिराती सादर करण्याचा अजित पवार गटाला आदेश

शिवरत्न बंगल्यावर सध्या निरव शांतता असून कोणीही उघडपणे, स्पष्टपणे बोलताना दिसत नाहीत.

माळशिरस तालुक्यातील उत्तमराव जानकर हे मोहिते-पाटील यांना या बंडात साथ देत आहेत की नाहीत? यावर गणिते अवलंबून

मोहिते पाटील व जानकर एक झाले तर भाजपला तालुक्यात किती मतदान होणार हाही कळीचा मुद्दा आहे.

शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com