Nitin Aatkare
Nitin Aatkaresakal

Mohol News : पिकावर फवारणीचे औषध प्राशन करून 46 वर्षीय प्रौढाची आत्महत्या

एका 46 वर्षीय प्रौढाने आत्महत्या केल्याची घटना सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्ग लगतच्या एका फॅक्टरी जवळील सिमेंट पाईप मध्ये घडली.
Published on

मोहोळ - पिकावर फवारणीचे औषध प्राशन करून, एका 46 वर्षीय प्रौढाने आत्महत्या केल्याची घटना सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्ग लगतच्या एका फॅक्टरी जवळील सिमेंट पाईप मध्ये घडली. नितीन भास्कर आतकरे (46) रा. देगाव (वाळूज) ता. मोहोळ असे मृताचे नाव आहे.

मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार, मृत नितीन चा भाऊ नितेश आतकरे याला मंगळवार ता 29 रोजी सकाळी साडेसात वाजता देगाव येथील बाबासाहेब आतकरे यांनी फोन केला, व तुमचा मोठा भाऊ नितीन याची मोटरसायकल सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्ग लगत उभी असून, कोठारी कंपनीच्या कंपाउंड लगत असलेल्या सिमेंटच्या नळ्यामध्ये तो बेशुद्ध पडला आहे तुम्ही लवकर या.

तातडीने नितेश आतकरे व इतर नातेवाईक घटना स्थळावर गेले असता त्या ठिकाणी नितीन हा पाण्याची बाटली उशाला घेऊन त्याचे नाका तोंडातून पांढऱ्या रंगाचा फेस आल्याचे दिसले. नितीन ज्या ठिकाणी पडला होता त्या नळी लगतच पिकावर फवारणी करण्याच्या औषधाची अर्धवट भरलेली बाटली आढळून आली. त्यामुळे नितीन याने औषध प्राशन केल्याची खात्री झाली.

तातडीने नितीन ला उपचारासाठी मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तो उपचारापूर्वीच मृत झाल्याचे घोषित केले. या बाबत नितेश भास्कर आतकरे वय (45) रा देगाव यांनी खबर दिली असून, चौकशी करून कायदेशीर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे. या घटनेचा तपास मोहोळ पोलीस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com