मोहोळ : ग्रामिण भागात आजही भाकणुकीच्या अंदाजावर केली जाते शेती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेती

मोहोळ : ग्रामिण भागात आजही भाकणुकीच्या अंदाजावर केली जाते शेती

मोहोळ : आणखी दोन महिने सूर्य आग ओकेल, वादळ वारे मोठ्या प्रमाणात होणार आहे, पाऊस जादा आहे, तो माळ्याच्या घरी आहे, पाऊस उशिरा सुरू होणार आहे, खरीप कमी पिकणार आहे, धान्य महागणार आहे, तर पांढरे धान्य जादा पिकेल, लाल व पिवळ्या पिकाला चांगला भाव येईल यासह अन्य मुद्द्यावर पापरी ता मोहोळ येथील मारुती मंदिरात गुढीपाडव्या दिवशी भाकणूक वर्तविण्यात आली.

ग्रामीण भागात भाकणुकीच्या अंदाजावर आज ही शेती केली जाते. सध्या जरी स्पर्धेचे युग असले, शेती क्षेत्रात आलेले नवनवीन तंत्रज्ञान, हवामान केंद्राने सुरू केलेला हवामानाचा अंदाज या सुविधा शेतकऱ्याला त्याच्या मोबाईलवर मिळत असल्या तरी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा भाकणुकी वर मोठा विश्वास आहे. कोरोना च्या संकटामुळे गेल्या दोन-तीन वर्षापासून मंदिरे बंद होती, परिणामी पाडवा वाचन बंद झाले होते. मात्र गेल्या दोन दिवसापूर्वी शासनाने कोरोना चे निर्बंध पूर्णपणे हटविल्याने ग्रामीण भागातील मारुती मंदिरे पाडवा ऐकण्यासाठी शेतकऱ्यांनी गजबजून गेली होती.

सर्व शेतकऱ्यांनी पाडव्या दिवशी पोळी आमटी वर ताव मारून दुपारी बारा वाजता मारुती मंदिरात गावातील दत्तात्रेय विठ्ठल विभूते यांनी पंचांगाच्या माध्यमातून पाडवा वाचण करण्यास प्रारंभ केला. कोरोनामुळे यात मोठा खंड पडला होता. चालू वर्षी माळ्याच्या घरी पाऊस आहे असे भाकित वर्तवले आहे. माळी समाज हा कायम भाजीपाला पिकवणारा समाज. त्यामुळे त्यांचा पाण्याचा दंड हा कायम ओला असतो. यामुळे पाऊस बऱ्यापैकी पडणार असा त्याचा अर्थ घेतला जातो. पांढरे धान्य चांगले पिकेल. त्यात सोयाबीन, ज्वारी, आदी पिकांचा समावेश आहे. लाल पिवळी पिके नफा देतील असे वर्तवण्यात आले आहे,

याचा अर्थ झेंडू, विविध फुले, डाळिंब, ड्रॅगन फ्रुट या पासून चांगले अर्थार्जन होणार आहे. जून महिना सुरू झाला की वादळाला सुरुवात होते. त्यात मोठ मोठ्या वावटळी तयार होतात त्यामुळे नुकसानीची बाजू वर्तविण्यात आली आहे. पैसा जपण्याचे ही भाकीत वर्तविले आहे, याचा अर्थ काटकसर करावी लागणार आहे. अनेक पिकांचा भाव सहा महिने वाढेल व सहा महिने कमी होईल असे भाकित वर्तवण्यात आले आहे याचा अर्थ तेजी-मंदी होणार हे अटळ आहे.

याच दिवशी सालगडी बदलणे जुन्याला निरोप देऊन नवीन गडी कामावर ठेवणे ही प्रक्रीया याच दिवशी संपन्न होते.

Web Title: Mohol Agriculture Still Practiced Rural Areas Basis Bhaknuki

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top