'अजितदादांना मी सोडलंच नाही, उलट दादांनीच मला सोडलं'; राष्ट्रवादीच्या माजी प्रदेश प्रवक्त्यांचा मोठा गौप्यस्फोट

NCP President Ajit Pawar : मोहोळ विधानसभा निवडणुकीत पक्ष बाजूला ठेवावा लागला, जुलमी राजवट घालविणे हे एकमेव उद्दिष्ट होते.
NCP President Ajit Pawar
NCP President Ajit Pawaresakal
Updated on
Summary

"त्यांना (अजितदादा) वाटलं ५० वर्षांची सत्ता आहे म्हणल्यावर सहज उमेदवार निवडून येऊ शकतो. आमची भूमिका ही जनतेशी बांधील आहे."

मोहोळ : अजितदादांना (Ajit Pawar) मी सोडलंच नाही; उलट दादांनीच मला सोडले, असा गौप्यस्फोट करत मोहोळ विधानसभा निवडणुकीत पक्ष बाजूला ठेवावा लागला, जुलमी राजवट घालविणे हे एकमेव उद्दिष्ट होते. निवडणुकी आधी उपमुख्यमंत्री अजितदादांना मी सांगितले होते, मोहोळमध्ये वातावरण राजन पाटील यांच्या विरोधात आहे, मात्र त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला नाही, असे राष्ट्रवादीचे माजी प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील (Umesh Patil) म्हणाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com