

Farmers in Mohol taluka face a severe drought-like situation as rainfall remains inadequate, affecting crops, water availability, fodder and dairy production.
Sakal
मोहोळ : गेल्या साडेतीन महिन्या पासून कोरडा गेलेला पावसाळा, विहिरीने व बोअर ने गाठलेला पाण्याचा तळ, तीव्र चारा टंचाई, पावसा अभावी वाया गेलेला खरीप हंगाम, यासह अन्य समस्या मुळे मोहोळ तालुका गडद दुष्काळाच्या छायेत सापडला असून, शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. मोहोळ तालुका त्वरित दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.