मोहोळ येथील मोफत आरोग्य तपासणी शिबीराचा दिडशे रूग्णांना लाभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

solapur

मोहोळ येथील मोफत आरोग्य तपासणी शिबीराचा दिडशे रूग्णांना लाभ

मोहोळ : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमीत्त प्रधानमंत्री भारतीय जन औषधी केंद्र मोहोळ यांच्या तर्फे आरोग्यम् ओ.पी.डी.हाऊस,मोमोहोळ येथे ता 16 ऑगस्ट रोजी "मोफत आरोग्य तपासणी शिबिर" आयोजित करण्यात आले होते.या शिबीरात सुप्रसिद्ध कन्सल्टिंग फिजीशियन डॉ.अच्युत नरुटे यांनी 150 रुग्णांची तपासणी केली. सर्व रुग्णांची मोफत रक्त तपासणीही करण्यात आली,गरजुंना औषधे ही मोफत देण्यात आली. या शिबीराचे उद्धाटन मोहोळ येथील नागनाथाचे मानकरी राजेंद्र खर्गे महाराज यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले.

यावेळी डॉ रश्मी बिराजदार ,संतोष शेंडे,जहांगीर मुजावर,बाबासाहेब विटेकरी,बापू सुर्यवंशी,रजनीकांत सुतार,प्रवीण आंडगे,गणेश राजमाने, विजयानंद स्वामी,ज्ञानेश्वर सिताप, सकलभूषण गुमते उपस्थित होते.शिबीर यशस्वी होण्यासाठी आरोग्यम् परिवारातील अमोल वराळे यांच्या सह सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.डॉ.अच्युत नरुटे हे दररोज सकाळी 10 ते 12 आणि संध्याकाळी 6 ते 8 या वेळेत आरोग्यम् ओ.पी. डी.हाऊस येथे उपलब्ध असणार असणार आहेत.

Web Title: Mohol Health Checkup Camp 150 Patients

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..