

मोहोळ : चालू वर्षी परटाच्या घरी पाऊस आहे, रब्बीला पाऊस जादा येईल, खरिपाला जेमतेम राहील. सध्या विश्वास संवत्सर चालू आहे, त्यामुळे नागरिक विश्वासाने एकमेकांशी वागतील, विश्वासघात होणार नाहीत. किडी रोगाचा प्रादुर्भाव राहील. अशी पाडवा भाकणूक पापरी ता मोहोळ येथील दत्तात्रय विभूते यांनी सांगितली.