Aslam Chaudhary and Ulka Patil
sakal
मोहोळ - अत्यंत राजकीय नाट्यमय घडामोडीनंतर मोहोळ तालुका पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम गफुर चौधरी यांची तर उपसभापतीपदी उल्का राजकुमार पाटील यांची निवड घोषीत करण्यात आली.
निवड जाहीर होताच फटाक्याची आतषबाजी करीत कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण केली. येथील सभापतीपद इतर मागास प्रवर्गासाठी आरक्षित आहे. तब्बल चार वर्षाच्या कालावधी नंतर सभापती खुर्चीवर विराजमान झाले आहेत. त्यामुळे तालुक्यातील विकास कामांना आता गती येणार आहे.