

Mohol Police
ESakal
मोहोळ - मोहोळ शहरात अनेक नागरी समस्या आहेत. सर्वसामान्य नागरिकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वर्षानुवर्ष प्रशासनाकडे लेखी, तोंडी तक्रारी करूनही त्यावर ठोस उपाय योजना होत नाही, त्यासाठी नगरपरिषद, तहसील व राष्ट्रीय महामार्ग प्रशासन यांच्या सहकार्याने जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुरज जगताप यांच्या मार्गदर्शना खाली या समस्यांचा निपटारा करण्यासाठी आता मोहोळ पोलिसांनी कंबर कसली असून, समजावून सांगून ही समजत नसेल तर थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा मोहोळचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी दिला.