
मोहोळ : मिनी बस, कंटेनर व मोटरसायकल या तीन वाहनांच्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. तर अन्य १५ जण जखमी झाले. जखमीपैकी ११ जणांवर मोहोळ येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर अन्य चार जणांना सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. हा अपघात सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील मोहोळ शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या कोळेगाव फाट्यावर दुपारी अडीच वाजता झाला. या अपघातामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.