

Who is Responsible: Driver Negligence or Family Oversight
Sakal
मोहोळ : मोहोळ ते मंद्रूप या महामार्गावर नजीक पिंपरी शिवारात शुक्रवार ता 26 रोजी अपघात होऊन दोन शाळकरी विद्यार्थिनींचा मृत्यू झाला. या अपघाताला जबाबदार कोण? पालक की बेदरकारपणे वाहन चालवणारे चालक? अशी चर्चा आता मोहोळ शहरात सुरू झाली आहे. यावर तातडीने उपाय योजना झाली नाही तर आणखी किती बळी जातील याचा विचार न करणेच बरे.