Assistant Engineer Suspended After MLA Raises Starred Question
मोहोळ : मोहोळ तालुक्यातील सीना नदीला गेल्या दोन महिन्यापूर्वी आलेल्या महापुरा मुळे नदीकाठच्या गावांचा विद्युत पुरवठा अद्यापही सुरळीत नाही, तो सुरळीत करण्यासाठी ट्रान्सफॉर्मर बसवावा लागतो.तो बसविण्या साठी लांबोटी येथील विद्युत केंद्रातील सहाय्यक अभियंता ओंकार साठे हा शेतकऱ्यांना पैसे मागत होता. या बाबतच्या तक्रारी शेतकऱ्यांनी आमदार खरे यांच्याकडे केल्या होत्या. आमदार खरे यांनी या बाबतचा तारांकित प्रश्न विधिमंडळात उपस्थित केला होता. त्याची दखल घेत सहाय्यक अभियंता साठे याला निलंबित केल्याची माहिती आमदार राजू खरे यांनी दिली.