Mohol News : तालुक्यातील 17 हजार हेक्टर क्षेत्रावरील ज्वारी काढणी अंतिम टप्प्यात

मोहोळ तालुक्यातील ज्वारी काढणी अंतिम टप्प्यात आली असून, ज्वारीच्या 'ताटां' चा गुंता झाल्याने ज्वारी काढणे त्रासदायक होत आहे.
Sorghum
Sorghumsakal

मोहोळ - मोहोळ तालुक्यातील ज्वारी काढणी अंतिम टप्प्यात आली असून, ज्वारीच्या 'ताटां' चा गुंता झाल्याने ज्वारी काढणे त्रासदायक होत आहे. मोहोळ तालुक्यात एकूण 17 हजार 110 हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची पेरणी झाली आहे.

चालू पावसाळ्यात अत्यंत कमी पाऊस पडल्याने इतर पिका पेक्षा ज्वारीची पेरणी मोठ्या प्रमाणात झाली आहे. पाणी पातळी खालावल्याने इतर काही पिके केली तर ती हाती लागण्याची खात्री नसल्याने शेतकऱ्यांनी ज्वारी, हरभरा, गहू या पिकांची पेरणी केली आहे. त्यात ज्वारीची पेरणी मोठ्या प्रमाणात केली आहे.

वातावरणातील बदलामुळे व कडक उन्हामुळे ज्वारीचे पीक लवकर काढणी योग्य झाले आहे. बहुतांश ज्वारीला पाणी मिळाल्याने ज्वारीच्या ताटा ची जाडी वाढल्याने ती काढणे जिकरीचे होत आहे. त्यासाठी शेतकरी बेडग्या चा वापर करीत आहेत.

ज्वारीचा आळा पुढे गेल्याने पेंढ्या बांधण्यासाठी अडचण येत आहे, त्यासाठी शेतकरी प्लास्टिक सुतळीचा वापर करीत आहेत. ज्वारी पेरणी केलेल्या शेतकऱ्याने कडब्याची 'ढेपण' लावून ठेवली आहे, जेणे करून भविष्यात पाऊस पडेपर्यंत चाऱ्या ची अडचण येणार नाही. सध्या कडब्याचा भाव 20 रुपये प्रति पेंडी आहे.

ज्वारी काढण्यासाठी मजूर 400 रुपये शेकडा व पेंड्या बांधण्यासाठी प्रतिपेंडी दोन रुपये मजुरी घेत आहेत. नवीन ज्वारी बाजार पेठेत आल्याने जुन्या ज्वारीचे दर कमी झाले आहेत. जुनी ज्वारी साडेतीन ते चार हजार रुपये क्विंटल विकली जात आहे. ज्वारी काढण्यासाठी महिला मजूर आघाडीवर आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com